कडकनाथ कोंबडी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता करोनाची लागण आणि त्यानंतर बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केला आहे. यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. यात कडकनाथ कोंबड्यांच्या मांसातून प्रोटीन, विटामिन, झिंक आणि लो फॅट मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोलेस्ट्रॉल फ्री असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे करोना झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर करायला हवं असं सांगण्यात आलं आहे. या पत्रावर नॅशनल मीट रिसर्च सेंटर आणि मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आलेला अहवालच्या प्रतीही जोडण्यात आल्या आहेत. ट्विटरवरही सूचना पत्र दिलं गेलं आहे. त्याचबरोबर दोन्ही संस्थांना पत्र आणि अन्य दस्ताऐवज पाठवण्यात आले आहेत. कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांमधूनही प्रोटीन मिळत असल्याच्या दाव्यावर जोर देण्यात आला आहे.
कडकनाथ कोंबडी पुन्हा चर्चेत!; करोना रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त असल्याचा रिसर्च सेंटरचा दावा
आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-07-2021 at 20:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The research center claims that kadaknath chicken useful for immunity in corona patients rmt