वॉशिंग्टन पोस्टचे प्रतिनिधी आणि सौदी वंशाचे अमेरिकन पत्रकार जमाल खशोगी यांचा शिरच्छेद झाला असल्याचा दावा एका तुर्की वर्तमानपत्राने एका ऑडिओ टेपच्या हवाल्याने केला आहे. रियाधमधील इस्तंबूलच्या दुतावासात खशोगी यांना ठार करण्यापूर्वी त्यांचा शारिरीक छळ करण्यात आला, विविध ऑडिओ टेप्समध्ये हे स्पष्टपणे ऐकू येत असल्याचा दावाही ‘येनी सफक’ या तुर्की वर्तमानपत्राने केला आहे. हे तुर्कस्तानातील सरकारी वर्तमानपत्र आहे.

येनी सफकच्या वृत्तानुसार, खगोशी यांची चौकशीदरम्यान बोटे छाटण्यात आली. त्यानंतर त्यांचा शिरच्छेदही करण्यात आला. खशोगी यांचे तुर्कीश मुलीशी लग्न ठरले होते. याबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी ते इस्तंबूलच्या दुतावासात गेले होते. त्यानंतर त्यांचा चौकशीच्या नावाखाली अतोनात छळ करण्यात आला आणि त्यांना ठार मारण्यात आले. तुर्कीश पोलिसांनीही खगोशी यांना १५ सौदी अधिकाऱ्यांच्या विशेष टीमने हत्या केल्याचे म्हटले आहे. मात्र, रियाधने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

अॅपल वॉचमध्ये खगोशी आणि अधिकाऱ्यांमधील संभाषण रेकॉर्ड झाल्याचा दावा ‘येनी सफक’ वृत्तपत्राने केला आहे. मात्र, तज्ज्ञांनी अॅपल वॉच अशा प्रकारे घडामोडींचे रेकॉर्डिंग करु शकत नाही असे म्हटले आहे. मात्र, येनी सफककडे हे रेकॉर्डिंग कसे झाले आणि ते त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.

सीएनएनने मंगळवारीच सांगितले होते की, सौदी अरेबियाचे सरकार एक असा अहवाल तयार करीत आहे. ज्यामध्ये सौदीकडूनच चौकशीदरम्यान खशोगी यांचा मृत्यू झाल्याचे अमेरिकेसमोर ते मान्य करु शकतात. मात्र, जर याबाबत सौदीकडून योग्य माहिती देण्यात आली नाही तर सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते.

Story img Loader