नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतनातील महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. तर गहू, हरभरा, सूर्यफुलासह तेलबिया व अन्य काही पिकांसाठी वाढीव हमीभाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. त्यानुसार आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतन धारकांचा महागाई भत्ता ८२ टक्क्यांवरून ८६ टक्के करण्यात आला असून १ जुलैपासून ही वाढ लागू असेल. याखेरीज रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड ११ लाख ७ हजार ३४६ कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीनिमित्त ७८ दिवसांचा बोनस देण्यात येणार आहे. यापायी सरकारी तिजोरीवर १ हजार ९६९ कोटींचा भार पडेल, असे ठाकूर स्पष्ट केले. 

हेही वाचा >>>“९/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही रागाच्या भरात…”,बायडेन यांचं मोठं वक्तव्य, नेतन्याहूंना सल्ला देत म्हणाले…

दरम्यान, यंदाच्या रब्बी हंगामासाठी तेलबिया, मोहरी, मसूर, गहू, हरभरा आणि सूर्यफुल या सहा पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. गेल्या आठ वर्षांमध्ये अन्नधान्यांचे उत्पादन २५१.५४ दशलक्ष टनांवरून ३३०.५४ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले असून ही वाढ ३१ टक्के असल्याचे ठाकूर म्हणाले. डाळींचे उत्पादन २७.५ दशलक्ष टन, तेलबियांचे उत्पादन ३१ दशलक्ष टनांपर्यंत होऊ लागले असल्याचा दावा त्यांनी केला.

वाढीव हमीभाव

पीक     हमीभावातील वाढप्रति क्विंटल

तेलबिया, मोहरी   रु. २००

मसूर      रु. ४२५

गहू        रु. १५०

सातू      रु. ११५

हरभरा    रु. ११५

सूर्यफूल  रु. ११५