पीटीआय, संयुक्त राष्ट्रे
गुन्हेगारांना शिक्षेची भीती नसणे, असमानता आणि अस्थिरता या बाबींमुळे जग अशाश्वत होत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मंगळवारी जागतिक नेत्यांना दिला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या वार्षिक चर्चेदरम्यान गुटेरेस यांनी वर्तमान जागतिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. विविध देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, राजे आणि अन्य सर्वोच्च नेते या चर्चेमध्ये सहभागी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगभरात वाढलेले भूराजकीय विभाजन, शेवट दृष्टीक्षेपात नसलेले युद्ध, हवामान बदल आणि अण्वस्त्रे व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेली शस्त्रास्त्रे यामुळे मानवजात अकल्पनीय गुंतागुंतीच्या दिशेने प्रवास करत आहे असे मत गुटेरेस यांनी व्यक्त केले. मात्र, आपल्याला भेडसावणाऱ्या या आव्हानांवर मात करणे शक्य आहे असा दिलासाही त्यांनी दिला. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायांनी धोके, अन्याय आणि लोकांच्या तक्रारी याचा सामना करणे आवश्यक आहे असा सल्ला सरचिटणीसांनी दिला. अनेक देश गुन्हेगारी कृत्ये करत आहेत आणि त्यांना त्याची शिक्षा मिळत नाही अशी टीका गुटेरेस यांनी केली.गाझा पट्टी, युक्रेन येथे सुरू असलेले युद्ध, सुदानमधील अंतर्गत यादवी आणि पश्चिम आशियात वाढणारा संघर्ष या परिस्थितीत आमसभेत जागतिक नेत्यांची बैठक सुरू झाली आहे.