हरियाणातील फतेहाबाद-टोहाना येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रात्री उशिरा एका तरुणाने धावत्या रेल्वेत एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित महिलेने विरोध करताच तिला धावत्या रेल्वेतून ढकलून दिले गेले. रेल्वेतून खाली पडताच या महिलेचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा महिलेसोबत तिचा नऊ वर्षांचा मुलगा देखील होता. महिलेला रेल्वेतून ढकलल्यानंतर आरोपीने देखील रेल्वेमधून उडी मारली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनदीप कौर (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. असे सांगण्यात आले आहे की, आरोपी तरुण नरवाना येथून रेल्वेत चढला होता आणि महिलेला एकटी पाहून त्याने तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. महिलेने अनेकदा विरोध केला. महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने तिला धक्काबुक्की केली. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मृत महिलेच्या नातेवाईकांना दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The woman was pushed down from the running train as she resisted the molestation msr
Show comments