अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नाने जगभरातील १२४ देशातील प्रसिद्ध गायकांनी महात्मा गांधी यांना अनोखी श्रद्धांजली दिली आहे.

महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनापेकी एक असलेले ‘वैष्णव जन तो तेने कहिए..’ ला १२४ देशांच्या गायकांनी मिळून गायले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनमध्ये सुरू असलेल्या अंतरराष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रमांमध्ये हा व्हिडिओ लाँच केला आहे.

या व्हिडिओमध्ये १२४ देशातील प्रसिद्ध गायकांनी आपापल्या देशातील बॅकग्राऊंडसोबत भजन गायले आहे. यात पाकिस्तानच्या गायकाचाही समावेश आहे. पाकिस्तानकडून शफकत अमानत अली यांनी आपला आवाज दिला आहे. पाकिस्तानशिवाय चीन, अफगाणिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकासारख्या शेजारील देशांच्या गायकांचाही समावेश आहे.

 

सोशल मीडियावर या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरराष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रमांमध्ये या व्हिडीओचा उल्लेख केला आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘ १२४ देशांतील सर्व कलाकार गांधीमय झाले आहेत’