१९ व्या शतकात जन्मलेल्या पण अद्यापही हयात असलेल्या जगातील सर्वात वृद्ध महिलेचं वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झालं आहे. नाबी ताजीबा असं त्यांचं नाव होतं. त्या  मुळच्या जपानच्या. ४ ऑगस्ट १९०० मध्ये त्यांचा जन्म झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर रविवारी त्याचं रुग्णालयातच निधन झालं.

सात महिन्यांपूर्वी जगातील सर्वाधिक वय असलेल्या महिलेचा मान त्यांना मिळाला होता. याआधी जमैकामधल्या महिलेच्या नावे हा विक्रम होता. ‘नाबी या कष्टाळू होत्या. आयुष्यभर त्यांनी कष्ट केलं. आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळो’ अशी प्रतिक्रिया त्यांच्या ६५ वर्षांच्या नातवानं दिली आहे. नाबी या जपानच्या आहे, या देशातील व्यक्ती सर्वाधिक वर्षे जिवंत राहतात असं म्हटलं जातं, हे खरंही आहे. कारण यापूर्वीच्या सर्वाधिक वय असेलल्या व्यक्ती या जपानच्याच आहेत. त्यांचा आहारच दीर्घायुष्याचं रहस्य असल्याचं मानलं जातं.

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जपानचे ११२ वर्षीय मसाझो नोनाका ओळखले जातात. २५ जुलै १९०५ मध्ये त्यांचा जन्म झाला. नोनाका हे सर्वात वयोवृद्ध असल्याचे प्रमाणपत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने त्यांना दिले आहे. जपानच्या उत्तरेकडील होकायडो बेटावर नोनाका यांचे वास्तव्य आहे.