Haryana Assembly Election 2024 Vote Counting Updates : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली आहे. भाजपा तिसऱ्यांदा शपथ घेण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निकालांनुसार भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेसचा पराभव स्पष्ट आहे. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचं काही दिवसांपूर्वीचं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं असून त्यावरून त्यांना ट्रोल केलं जात आहे.
सकाळी दहा वाजेपर्यंतच्या निकालानुसार हरियाणात काँग्रेसच्या बाजूने कल दिसत होता. त्यामुळे दिल्ली आणि हरियाणात जल्लोष सुरू झालेला. काँग्रेसच्या कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. परंतु, दहानंतरच्या निकालांनुसार काँग्रेसची पिछेहाट होत भाजपाला स्पष्ट बहुमत असल्याचं सिद्ध झालं.
९० सदस्यांच्या विधानसभेसाठी हरियाणात बहुमतासाठी ४६ चा आकडा पार करणं गरजेचं आहे. तर, भाजपाने आतापर्यंत ५० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे निकाल हळूहळू स्पष्ट होत जातोय. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर भाजपाने २० पेक्षा जागा जिंकल्या तर मी माझं नाव बदलेन, असं आव्हान सुप्रिया श्रीनेत यांनी ऑन कॅमेरा दिलंय. त्या म्हणाल्याकी, भाजपाने २० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी माझं नाव बदलेन. १५ ते २० जागाच भाजपा जिंकेल. कदाचित याच्यापेक्षाही कमी, पण जास्त नाही.
हेही वाचा >> हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”
सध्या हाती येत असलेल्या निकालांवरून हरियाणात भाजपाचं कमळ फुलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेटिझन्सने सुप्रिया श्रीनेत यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. सुप्रिया श्रीनेत यांना आता जलेबी बाई म्हणून हाक मारा अं काहीजण म्हणाले आहेत तर, काहीजणांनी गाली वाली दिदी म्हणून हाक मारायला सुरुवात करायची असं का विचारलं आहे.
https://x.com/MrSinha_/status/1843529394364789185?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1843529394364789185%7Ctwgr%5E49aa3e102707a60f385989565b81a926ca59d4e5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fm.economictimes.com%2Fnews%2Fnew-updates%2Fwill-change-name-if-bjp-wins-20-seats-supriya-shrinates-promise-goes-viral-netizens-troll-jalebi-bai%2Farticleshow%2F114038647.cms“If BJP crosses 20 seats, I will change my name” – Supriya Shrinate
— Major Surendra Poonia (@MajorPoonia) October 8, 2024
Dear friends, Plz suggest some good names to @SupriyaShrinate Didi ?#HaryanaElectionResult pic.twitter.com/oxOgr2vsyw
She 'Gaali wali didi' –@SupriyaShrinate proudly said, I'll change my name if BJP crosses 20 seats in Haryana !
— Rahul Jha (@JhaRahul_Bihar) October 8, 2024
As per EC data BJP is on half century i.e 50 seats .
What should we call her now ? #HaryanaElectionResult pic.twitter.com/Ok5RUSG8YK