कथित मद्यघोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले होते. त्यानुसार, त्यांना ३ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, अरविंद केजरीवाल यांनी हे समन्स धुडकावून लावले. परिणामी आज त्यांच्या ईडीची घरावर धाड पडण्याची शक्यता असून त्यांना अटक होण्याची भीती आप नेत्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“दोन वर्षांपासून भाजपाच्या सर्व यंत्रणांनी अनेकदा छापे मारले. परंतु, एकाही पैशाची अफरातफर सापडली नाही. एकही पैसा सापडला नाही. जर भ्रष्टाचार झालाय तर करोडो रुपये कुठे गेले? सर्व पैसा हवेत गायब झाला का?” असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी ईडी आणि भाजपाला विचारला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“सत्य हे आहे की, भ्रष्टाचार झालाच नाहीय. भ्रष्टाचार झाला असता तर पैसे मिळाले असते. अशा खोट्या प्रकरणात आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना यांनी तुरुंगात डांबलं आहे. कोणाविरोधातही काहीच पुरावा अद्याप सापडलेला नाही. काहीच सिद्ध होत नाहीय. सगळी गुंडागर्दी सुरू आहे. कोणालाही पकडून अटक केली जात आहे. आता मला अटक करण्याचा यांचा मनसुबा आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

“प्रामाणिकपणा ही माझी सर्वात मोठी संपत्ती आणि ताकद आहे. खोटे आरोप लावून, बनावट समन्स पाठवून हे मला बदनाम करायला पाहत आहेत. यांनी मला समन्स पाठवले आहेत. माझ्या वकिलांनी मला सांगितलं हे समन्स बेकायदा आहेत. समन्समध्ये काय बेकायदा आहे हे मी त्यांना सविस्तर लिहून पाठवलं आहे. पण त्यांनी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. याचा अर्थ त्यांच्याकडे माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. त्यांनी पाठवलेली नोटीसही खोटी आहे”, असा पलटवार अरविंद केजरीवाल यांनी केला.

“कायद्यानुसार मला समन्स आले तर मी नक्की सहकार्य करेन. चौकश करणे हा भाजपाचा हेतू नाहीच. त्यांचा हेतू एकच लोकसभा निवडणुकीचं आहे. त्यांना ही निवडणूक जिंकायचीच आहे. या प्रकरणाच्या तपासाला दोन वर्षे झाली. मग लोकसभा निवडणुकीच्या आधीच मला का बोलावलं जातंय? सीबीआयने मला आठ महिन्यांपूर्वी बोलावलं होतं. मी सीबीआयमध्ये गेलो होतो, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. आता ते लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी बोलावत आहेत. त्यामुळे भाजपाचा हेतु चौकशी करणं हा नाहीच आहे”, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >> दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडीकडून आज अटक होणार? कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, सुरक्षा व्यवस्थाही वाढवली!

भाजपाचा हेतु चौकशीच्या बहाण्याने मला बोलवायचं आणि अटक करायची आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीसाठी मी प्रचार करू नये. आज भाजपा भ्रष्टाचारांना पकडत नाही. खुलेआमपणे सरकारी यंत्रणांचा वापर करून इतर पक्षांना तोडून आपल्या पक्षात सामील करून घेतलं जात आहे. ज्या नेत्यांवर ईडी, सीबीआयचे चौकशी सुरू होत्या, ते नेते भाजपात सामील झाल्यावर त्यांची जुनी प्रकरणे बंद करण्यात आली. जो यांच्या पक्षात सामिल होतो, त्यांची प्रकरण दाबली जातात. जे त्यांच्या पक्षात जात नाही त्यांच्यावर कारवाई केली जाते. आज मनिष सिसोदिया, संजय सिंग आणि विजय नायर यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून ते तुरुंगात नाहीयत तर त्यांनी भाजपात सामिल होण्यास नकार दिल्याने ते तुरुंगात आहेत”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

हेही वाचा >> समन्स नाकारत केजरीवाल ‘ईडी’विरोधात आक्रमक; प्रश्नावलीची मागणी करत दबावाचा प्रयत्न

“आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आम्हीही इतर नेत्यांप्रमाणे भाजपात सामिल झालो असतो. अशाप्रकारे भ्रष्टाचारी लोकांना पक्षात सामिल करून देश चालत नाही. जे काही चालतंय ते वाईट आहे. हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. मी नेहमी देशासाठी लढलो आहे. माझं तन, मन, धन देशासाठी आहे. माझा प्रत्येक श्वास देशासाठी आहे. माझ्या रक्तातील प्रत्येक थेंब देशासाठी आहे. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग देशासाठी आहे. आपल्याला एकत्र येऊन देशाला वाचवायचं आहे”, असं आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

Story img Loader