पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. एवढंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी AI चा नवा अर्थही सांगितला. AI म्हणजे अमेरिका-इंडिया असं नरेंद्र मोदी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवादाच्या मुद्द्यावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांननी अमेरिकेवर झालेला ९/११ चा हल्ला आणि भारतावर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला याबाबत आपल्या भाषणात भाष्य केलं. ते म्हणाले, “दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावं लागेल. आपल्या देशांची एकजूट या दहशतवादाचा सामना करु शकते. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही दहशतवादाचा धोका आहेच. त्याचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.

हे पण वाचा :”व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘We The People’ चा नारा! भाषणात लोकशाहीचा उल्लेख करत म्हणाले…

युक्रेन आणि रशिया युद्धाचा उल्लेख

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला. ते म्हणाले “ही वेळ युद्धाची नाही. युक्रेनमध्ये सुरु असलेला रक्तपात थांबणं आवश्यक आहे. युद्धामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो. मात्र चर्चा केल्याने अनेक गोष्टींमधून मार्ग निघू शकतो. रशिया आणि युक्रेन यांच्या फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु आहे. भारतातर्फे दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.”

“भारतात विविधेत एकता आहे. आज जगाला भारताविषयी माहिती हवी आहे, भारतात काय सुरु आहे? याची जिज्ञासा जगभरात अनेकांना असते. मी या सदनातही ती जिज्ञासा पाहू शकतो. भारताचा विकास, तिथली लोकशाही आणि विविधेत असलेली एकता या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला समजून घ्याव्याश्या वाटत आहेत. भारत एखादी गोष्ट कशी करतो? कोणत्या गोष्टीला कसं तोंड देतो? याकडे जगाचं लक्ष असतं.”

“आधी भारत हा जगातली दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता. मात्र आता भारत जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. २०२५ पर्यंत भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होईल याबाबत माझ्या मनात शंका नाही. भारतात विकासाला प्रचंड मोठी गती मिळाली आहे.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There can be no ifs and buts in dealing with terrorism says pm modi terms it enemy of humanity scj
Show comments