पीटीआय, नवी दिल्ली

हरियाणा तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी होण्याची शक्यता कमी असल्याचे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. मात्र महाराष्ट्र तसेच झारखंडमध्ये इंडिया आघाडी एकत्रित निवडणूक लढवेल असे त्यांनी जाहीर केले.

Andhra Pradesh Chief Minister N Chandrababu Naidu meets Prime Minister Narendra Modi in New Delhi
चंद्राबाबू यांची पंतप्रधानांशी चर्चा
uddhav thackeray narendra modi (14)
“मोदींनी कोट्यवधी लोकांना घरबसे व आळशी केले”, ठाकरे गटाची आगपाखड; ‘हे’ दिलं कारण!
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
india China Foreign Ministers discuss peace
भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांची शांततेवर चर्चा; पूर्व लडाखच्या वादावर लवकर तोडगा काढण्यावर विचारमंथन
how to save in water
वाहत्या पाण्यात समूहाने अडकलात तर स्वतःसह इतरांचा जीव कसा वाचवाल? भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर प्रशिक्षण देणारा VIDEO व्हायरल!
Bridge collapsed in Bihar
बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला; १५ दिवसांतील दहावी घटना

विधानसभा निवडणुकीत सर्वत्र एकच सूत्र असणार नाही असे त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. जेथे सहमती होईल तेथेच अशी आघाडी होईल. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत आघाडी नव्हती. हरियाणात आम्ही आम आदमी पक्षाला लोकसभेला एक जागा दिली होती. मात्र विधानसभेला ही आघाडी होईल असे वाटत नाही असे रमेश यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सहा महिन्यांनंतर पुन्हा स्वीकारला पदभार!

दिल्लीत तर आम आदमी पक्षानेच आघाडी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाशी काँग्रेसची आघाडी असल्याचे रमेश यांनी सांगितले. तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाशी युती आहे असे नमूद केेले. संसदेत इंडिया आघाडीची एकजूट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत बिजु जनता दलाने विरोधकांना साथ दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

भाजपच परजीवी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला ‘परजीवी’ पक्ष म्हणून संबोधल्याबद्दल रमेश यांनी संताप व्यक्त केला. भाजप हाच परजीवी पक्ष असून त्यांनी प्रादेशिक पक्षांना ‘खाऊन टाकले’ आहे, असा आरोप रमेश यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेबाहेर एकमत घडवून आणण्याचे आवाहन केले, परंतु संसदेत संघर्षाचा पर्याय निवडला, असे रमेश म्हणाले.