२२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सगळ्या महोत्सवाची तयारी देशभरात सुरु आहे. अशात एका राज्याने २२ जानेवारी या दिवशी ड्राय डे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगडने २२ जानेवारीला जाहीर केला ड्राय डे

छत्तीसगड या राज्याने २२ जानेवारीच्या दिवशी म्हणजेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी ड्राय डे जाहीर केला आहे. मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी या दिवसाची घोषणा केली आहे. तसंच २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत आम्ही सुशासन सप्ताह ठेवला होता असंही त्यांनी सांगितलं. त्याचवेळी त्यांनी २२ जानेवारी रोजी ड्राय डे असेल अशी घोषणा केली. आमचा राज्य चालवण्याचा आदर्श रामराज्य आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- कुठे फटाक्यांची आतिषबाजी, तर कुठे दिव्यांची रोषणाई; देशभरात दिवाळीचा उत्साह, पाहा PHOTO

मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सांगितलं की तांदूळ उत्पादक संघटनांकडून ३ हजार टन तांदूळ अयोध्येला पाटवला आहे. तसंच २२ जानेवारीच्या दिवशी संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण असणार आहे दिवाळीसारखं वातावरण असेल, राज्यातल्या जनतेनेही दिवाळी साजरी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच २२ जानेवारी या दिवशी राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्यावेळी राज्यात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये प्रभू रामचंद्रांचे आजोबा राहून गेले आहेत. आम्ही त्यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be dry day in chhattisgarh on 22nd january said chhattisgarh cm scj
Show comments