टीव्हीवरील चॅनेल संदर्भात लागू होत असलेल्या नव्या नियमावलीमुळे केबल सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही किंवा ती बंद ठेवण्यात येणार नाही, असा खुलासा ट्रायने केला आहे. त्यामुळे आता चॅनेल बंद होणार असल्याच्या अफवेला चाप बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्रायने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, आम्हाला गेल्या काही दिवसांपासून केबलच्या नव्या नियमावलीसंदर्भात चुकीची माहिती प्रसारित होताना आढळून आली आहे. २९ डिसेंबरपासून चॅनेल्सचे नवे पॅकेज लागू होत असल्याने या दिवशी संध्याकाळी ७ ते रात्री १० या काळात सध्या सुरु असलेले चॅनल्स बंद राहणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र, या केवळ अफवा असून नव्या नियमावलीमुळे अशा प्रकारे केबल सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही.

ट्रायने ग्राहकांना आपल्या पसंतीचे चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे जे चॅनेल्स त्यांना पहायचे असतील त्याचेच पैसे त्यांना द्यावे लागतील. यामुळे ग्राहकांचे केबलचे दर कमी होणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.

मात्र, नवी नियमावली आणि आमच्यावर घातलेल्या जाचक अटींमुळे ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचा दावा केबल ऑपरेटर्सने केला आहे. याला विरोध म्हणून देशभरातील केबल व्यावसायिक गुरुवारी, २७ डिसेंबर रोजी केबल सेवा बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या केवळ अफवा असून केबल सेवा बंद राहणार नसल्याचे स्पष्टीकरण ट्रायने दिले आहे.