Thief Returns Idols Prayagraj Temple: चोरी केल्यानंतर चोराला झालेला पश्चाताप आणि त्यातून चोरीचे सामान परत करणे, या घटना आता नवीन नाहीत. मात्र प्रयागराज येथे एका चोराने चक्क देवाची मूर्ती चोरली. पण चोरीनंतर त्याच्या आयुष्यात खळबळ माजल्यानंतर चोराने माफिनामा लिहून या मूर्ती पुन्हा एकदा मंदिरात ठेवल्या आहेत. प्रयागराज येथे प्रसिद्ध अशा गौ घाट आश्रमातील एका मंदिरातून राधा-कृष्णाची मूर्ती चोरीला गेली होती. यानंतर चोराने पुन्हा ही मूर्ती मंदिरात आणून दिली. त्याने पत्रातून दिलगिरी व्यक्त केली. “जेव्हापासून मी मूर्ती चोरली तेव्हापासून माझ्या घरात आजारपण सुरू झाले. माझा मुलगा, पत्नी आजारी पडले आहेत. मूर्ती चोरल्यापासून माझे दिवस वाईट जात आहेत. त्यामुळे मी या चोरीबद्दल माफी मागतो”, असे चोराने लिहून ठेवले.

पोलिसांनी सांगितले की, मंगळावारी एक माणूस मंदिरात बॅग सोडून जाताना काही स्थानिकांनी पाहिले. ही बॅघ उघडल्यानंतर त्यात मंदिरातील राधा-कृष्णाची मूर्ती आढळून आली. तसेच बॅगेत एक पत्रही आढळून आले. या पत्रात चोराने सदर मूर्ती परत करण्याचे कारण विशद केले होते. २३ सप्टेंबर रोजी मंदिरात चोरी झाली होती. त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी चोराने या मूर्ती परत आणून ठेवल्या.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
complaint with allegations against Ranjit Kamble says he is sand mafia and gangster
‘रणजित कांबळे हे रेती माफिया, गुंडागर्दी करणारे’, आरोपासह तक्रार
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक
burglar in pune arrested involved in four crime cases
घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पकडले; चार गुन्हे उघड
father held for molesting 14 year old girl in nagpur
जन्मदात्याकडून किळसवाणा प्रकार

हे वाचा >> नारायण सुर्वे यांच्या घरी चोराने मारला डल्ला, नंतर चिठ्ठी लिहून परत केली वस्तू; म्हणाला, “मला माहीत नव्हतं..”

अज्ञानातून चोरी केली, माफी मागतो

पत्रात लिहिल्याप्रमाणे, “मी अज्ञानातून राधा-कृष्णाच्या मूर्ती चोरल्या, माझ्या हातून पाप घडले. चोरी केल्यापासून माझ्या आयुष्यात काहीच ठीक झालेले नाही. माझी झोप आणि भूक उडाली. मला स्वस्थपणे जगता येत नाही. एवढेच नाही तर चोरीनंतर माझी पत्नी आणि मुलगाही आजारी पडला. थोड्या पैशांसाठी मी ही चोरी केली होती. पण आता माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणींना पाहता मी ही मूर्ती परत करत आहे. मंदिराची अमानत परत मंदिराकडे सुपूर्द करत आहे.”

यानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी मूर्तीची ओळख पटवली आणि विधीवत पूजा करून मूर्त्या पुन्हा मंदिरात स्थापित केल्या. टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना नवाबगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार मिश्रा म्हणाले की, चोरी झाल्यानंतर मंदिराचे महंत स्वामी जयराम दास महाराज यांनी एफआयआर दाखल केला होता. तसेच आता त्यांनी सांगितले की, चोराने मूर्त्या परत देताना त्या व्यवस्थित बांधून आणल्या होत्या.