केवळ कॉंग्रेसच्या पाठिंब्यावरच केंद्रात तिसऱया आघाडीचे सरकार येणे शक्य असल्याचे लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी मंगळवारी सांगितले.
तिसऱया आघाडीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्ष असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसचाच पाठिंबा घ्यावा लागेल. त्यामुळेच तिसरी आघाडी केवळ कॉंग्रेसच्या पाठिंब्यामुळे केंद्रात सत्तेवर येऊ शकेल, असे मी म्हटल्याचे पासवान यांनी सांगितले. लोक जनशक्ती पक्षाला पुढील काळातही कॉंग्रेससोबतच राहायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सध्या सर्व बाजू विचारात घेऊन चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-11-2013 at 04:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third front govt possible with congress support paswan