ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदू मंदिरांवर सतत हल्ले होत आहेत. मेलबर्नमधील अल्बर्ट पार्क येथे असलेल्या हिंदू मंदिराची तोडफोड करण्याची घटना घडली आहे. मेलबर्नमधील खालिस्तानी समर्थक वारंवार हिंदू मंदिरांना लक्ष्य करत आहेत. याआधी १७ जानेवारी रोजी मेलबर्नमधीलच बीएपीएस स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. मागच्या पंधरा दिवसातला हा तिसरा हल्ला आहे. मेलबर्नमधील अल्बर्ट पार्क येथील हिंदू मंदिराची तोडफोड करतानाच मंदिराच्या भींतीवर खालिस्तानी समर्थकांनी भारताविरोधी मजकूर देखील लिहिला आहे. याठिकाणी असलेले इस्कॉनचे मंदिर हरे कृष्ण मंदिर या नावाने ओळखले जाते. मेलबर्नमधील भक्ती योग आंदोलनाचे हे प्रमुख केंद्र आहे. सोमवारी सकाळी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मंदिराची तोडफोड झाल्याचे लक्षात आले, तसेच मंदिराबाहेरील भिंतीवर “खालिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा लिहिल्याचेही दिसले.
ऑस्ट्रेलियात तिसऱ्या हिंदू मंदिराची तोडफोड; भिंतीवर भारतविरोधी मजकूर
ऑस्ट्रेलियात खालिस्तानी समर्थकांकडून मागच्या १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले असून मंदिराबाहेर भारताविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-01-2023 at 11:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third temple vandalised in melbourne australia with hindu hate graffiti by khalistan supporters kvg