भारत आणि पूर्व नेपाळच्या कोपऱ्यात जगातील सर्वांत उंच पर्वत आहेत. हिमालयातील या भागांना निसर्गाने भरभरून दिलंय. चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंगमध्ये दुर्मिळ ऑर्किडची झाडंही आहेत. इथल्या हिरव्यागार टेकड्यांवर लाल पांडा स्वच्छंदीपणे बागडतही असतात. पण येथे राहणाऱ्या लोकांचं जीवन इतरांपेक्षा जरा कठीण आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

माऊंट एव्हरेस्टजवळ जन्मलेल्या पासांग शेर्पा या शेतकऱ्याची मका आणि बटाट्याची चांगली पिके होती. परंतु, येथील जंगली प्राण्यांनी येथे उच्छाद मांडल्याने ही पिके नष्ट होऊ लागली. अखेर, या पारंपरिक वनस्पतींचा शेर्पा यांनी त्याग केला आणि ज्या पिकांना अधिक महत्त्व नाही त्यांची लागवड केली. पिवळ्या फुलांचं झुडूप असलेल्या सदारहित राहणाऱ्या आर्गेली या जंगली झुडपाची लागवड करण्यात आली. कुंपण आणि सरपणासाठी याचा वापर केला जातो. परंतु, ही लागवड त्यांच्यासाठी पैशांचा पाऊस पाडेल याची कल्पना नव्हती. जगातील अत्यंत गरीब भाग आता अत्यंत श्रीमंत देशांना कच्चा माल पुरवतं.

319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
जेवणापूर्वी व्हिनेगर का पितात जपानी लोक? तज्ज्ञांनी केला खुलासा….
Sambhal Jama mosque
संभल येथील जामा मशिद परिसरातील विहिरीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मंदिर की मशिदीला मिळणार पाणी?
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले
Soyabean Purchase Objective Failed farmers in trouble
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?
general administration department issued a circular on national heroes anniversaries opposed by mahanubhava corporation
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…

जपानचे चलन विशेष कागदावर छापलेले असते. हा कागद सहज उपलब्ध होत नाही. जपानी लोकांना त्यांच्या जुन्या शैलीच्या येन नोटा आवडतात. यासाठी शेर्पा यांनी लावलेल्या आर्गेली झाडांच्या पानांचा वापर केला जातोय. याबाबत शेर्पा म्हणाले, हा कच्चा माल जपानला निर्यात केला जाईल. यातून मी पैसे कमावू शकेन असं मला वाटतं. मी खूप आनंदी आहे. हे यश कुठूनही आलेलं नाही.

जपानच्या नोटा छापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मित्सुमाता या पारंपरिक कागदाचा पुरवठा कमी होत होता. हा कागद Thymelaeaceae या वनस्पतींच्या वृक्षाच्छदी लगद्यापासून तयार केला जातो. याची लागवड मध्यम सूर्यप्रकाश असलेल्या जागेवर होते. कमी होत चाललेली ग्रामीण लोकसंख्या आणि हवामानातील बदल जपानच्या शेतकऱ्यांना त्यांचे श्रम केंद्रित भूखंड सोडून देण्यास प्रवृत्त करत होते.

जपानच्या ओसाका येथे कानपौ. इंक कंपनी जपानी सरकारसाठी कागद तयार करते. मित्सुमाता या झाडाच्या मूळ प्रजातीची लागवड हिमालयात होते, असं या कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळली. अनेक वर्षांच्या चाचणी आणि त्रुटीनंतर कंपनीने शोधले की आर्गेली ही त्याचप्रमाणे वनस्पती असून शेतकऱ्यांना योग्य ट्रेनिंग दिल्यास जपानची कागदाची भूक भागू शकेल.

शेर्पांना मिळणार ८० कोटी रुपये

२०१५ साली नेपाळमध्ये मोठा भूकंप आला होता. यामुळे नेपाळ उद्ध्वस्त झाला. यामुळे तिथे क्रांतीकारी बदलांना सुरुवात झाली. जपानी लोकांनी काठमांडूला तज्ज्ञांचा एक चमू पाठवला. थंड पण कठोर येनचा कागद बनवण्यासाठी त्यांनी तेथील नागरिकांना प्रशिक्षित केलं. याचा परिणाम असा झाला की शेर्पाने आता ६० स्थानिक लोकांना त्याच्या कापणीच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी नियुक्त केले आहे. त्यांना आता नेपाळी चलनाचे ८० कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.

Story img Loader