पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घाईघाईत घेतला गेला असून तो पूर्णपणे अविचारी आहे. काहीही विचार न करत नरेंद्र मोदी हे देशाची चेष्टा करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला. ते शनिवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कपिल सिब्बल यांनी नोटा रद्द करण्याचा निर्णयावरून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. सध्या देशभरात ‘बँक मे कतार है, आम आदमी लाचार है और मोदी जिम्मेदार है’ अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत मोदींनी देशात असायला हवे होते. मात्र, ते जपानला जाऊन बसले आहेत, असा टोला सिब्बल यांनी लगावला.
मोदी सरकारने काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा तडकाफडकी निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शंभर रूपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशभरातील बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. यावरूनही कपिल सिब्बल यांनी टीका केली आहे. बँकेतील खाते माझे आहे, पैसे माझे आहेत मग मी रांगेत उभे का राहावे?, असा सवाल यावेळी सिब्बल यांनी उपस्थित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा