पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची ही वेळ नाही… या शब्दांत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पूंछमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या हल्ल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. संसदेमध्ये पत्रकारांशी बोलताना अडवाणी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅंटनी यांनी संसदेत मंगळवारी केलेल्या निवेदनात पाकिस्तानाला वाचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हल्लेखोरामध्ये पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाचे जवान होते, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र, संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या निवेदनातून हा उल्लेख काढून टाकण्यात आला असून, हल्लेखोर पाकिस्तानी लष्कराच्या वेशात आल्याचे म्हटले असल्याबद्दल अडवाणी यांनी नाराजी व्यक्त केली.

Story img Loader