चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे, असं विधान केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी केलं होतं. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक मंत्री म्हणत आहेत, चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. मग आम्ही त्यांच्याशी कसं लढू शकतो? इंग्रजांशी लढताना भारताची अर्थव्यवस्था मोठी होती का? ह्याला भित्रेपणा म्हणतात,” असे टीकास्त्र राहुल गांधींनी भाजपावर सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये काँग्रेसचं ८५ वे महाअधिवेशन पार पडत आहे. तेव्हा बोलताना राहुल गांधी म्हटलं की, “बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे. म्हणजे कमकुवत असणाऱ्यांशीच तुम्ही लढणार का? याला भित्रेपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद. आम्हाला सत्याग्रही म्हणता, पण तुम्ही सत्ताग्राही आहात.”

“५२ वर्षे झाली माझ्याकडं घर नाही”

“१९७७ सालाची गोष्ट आहे. तेव्हा मी सहा वर्षाचा होतो आणि आम्हाला राहतं घर सोडून जायचं होतं. घरी वेगळंच वातावरण होतं. मी आईकडे गेले आणि तिला विचारलं काय झालं आहे. तेव्हा तिने सांगितलं, आपण हे घर सोडत आहे. तोपर्यंत ते आमचं घर आहे, असं वाटायचं. मात्र, आईने म्हटलं, हे आपलं घर नाही, सरकारी घर आहे. ५२ वर्षे झाली माझ्याकडे आजही घर नाही,” असा भावनिक प्रसंग राहुल गांधींनी अधिवेशनात सांगितला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is savarkar ideology you call it nationalism rahul gandhi attacks bjp ssa