मोदी सरकारने गेल्या दोन महिन्यात घेतेलेल्या काही महत्वाच्या निर्णयामुळे आजपासून सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक धोरणांमध्ये काही अमुलाग्र बदल झालेत. या आर्थिक धोरणाचा सर्वसामान्य लोकांना काही ठिकाणी फायदा होणार आहे. तर काही ठिकाणी नुकसानाला सामोरं जावे लागणार आहे. जाणून घेऊयात काय बदल झाले आहेत.
- ऑक्टोंबर-डिसेंबर या तिमाहीमध्ये करण्यात येणाऱ्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूकीवरील व्यजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सुकन्या समृद्धी स्कीम, नेशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC), पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF), किसान विकास पत्र (KVP) आणि पोस्ट ऑफिसमधील छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूकीवरील व्याजदरात ०.४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे.
- जीएसटीच्या नियमांनुसार टॅक्स डिडक्टेड सोर्स (TDS) आणि टॅक्स कलेक्टेड सोर्स (TCS)वर अतिरिक्त कर लावण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदी आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांवर १ टक्का टीसीएस द्यावा लागणार आहे. तसंच प्रत्येक राज्यात या कंपन्यांना स्वतंत्र रजिस्ट्रेशनही करावं लागणार आहे. यामुळे ऑनलाइन वस्तू आता महागणार आहेत.
- पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. आता नैसर्गिक गॅसची किंमत वाढणार आहे. नैसर्गिक गॅसची किंमत वाढल्याचा परिणाम थेट एलपीजी सिलेंडरच्या किमतीवर पडला आहे. आजपासून अनुदानित सिलेंडर २ रुपये ५९ पैशांनी तर विनाअनुदानित सिलेंडर ५९ रुपयांनी महागणार आहे.
- कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे फक्त तुम्ही आम्ही नाही, तर पतंप्रधान नरेंद्र मोदीही त्रस्त आहेत. कित्येकवेळा फोनवर बोलत असताना कॉलमध्येच कट होत असल्यामुळे महत्त्वाचं बोलणंही पूर्ण होत नाहीये. यावर तोडगा म्हणून कॉल ड्रॉप झाल्यास १ ऑक्टोबरपासून टेलिकॉम कंपन्यांकडून दंड आकारण्यात येणार आहे. २०१० नंतर कॉल ड्रॉप समस्येवर पहिल्यांदा असा निर्णय घेण्यात आला आहे.
- एखाद्या राजकीय पक्षाला प्रचारासाठी मदतनिधी देण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड्स विकत ग्राहकांना विकत घेता येतील. या बॉन्ड्सची खरेदी १० ऑक्टोबरपर्यंत करता येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बॉन्ड्स जारी करण्याची मंजूरी दिली आहे.
- कमी आणि दीर्घ काळांच्या कर्जावरील व्याजदरात पंजाब नॅशनल बँकेने ०.२ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पीएनबीतील ऑटो आणि पर्सनल लोन आता महागणार आहे.