यंदाच्या आर्थिक वर्षात देशभरातील काँर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचा-यांना मागील वर्षापेक्षा पगारात अकरा टक्केच पगारवाढ मिळण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी देशातील सरासरी पगारवाढ बारा ते तेरा टक्के इतकी होती. ‘माय हायरिंग क्लब डॉट कॉम’ या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात हे अंदाज व्यक्त केले आहेत. यात मार्च २०१३ अखेरीस देशातील पगारवाढ सरासरी अकरा टक्के होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी ही सरासरी पगारवाढ बारा ते तेरा टक्के इतकी होती. विमानसेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांना सरासरी सात टक्के पगारवाढ मिळू शकते. तर रिटेल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वांत जास्त, म्हणजे तेरा टक्के वाढ मिळू शकेल, असे अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त केले आहेत.    
देशातील पगारवाढीची सरासरी मागील वर्षापेक्षा एक ते दोन टक्क्यांनी कमी झाली असल्याचे ‘माय हायरिंग क्लब डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे संचालक राजेश कुमार यांनी स्पष्ट केले
‘कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव देताना कंपन्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतात. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात सरासरी अकरा टक्के पगारवाढ अपेक्षित आहे.’, असे ‘एँपेक्स एचआर सोल्यूशन’चे व्यवस्थापकीय संचालक विष्णू शंकर यांनी स्पष्ट केले.       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा