ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी भीमा- कोरेगावमधील हिंसाचाराप्रकरणी गौतम नवलाखा, वरवरा राव, व्हर्नन गोन्सालविस, अरूण फरेरा आणि सुधा भारद्वाज यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध दर्शवला आहे. हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले, असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले असून या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. शाह हे शहरी नक्षलवादाला पाठिंबा देत असल्याची टीका सोशल मीडियावर सुरु झाली असून #NaseerForNaxals हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिगमध्ये होता.
‘अॅम्नेस्टी इंडिया’ने शुक्रवारी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा एक व्हिडिओ प्रकाशित केला असून या व्हिडिओत नसीरुद्दीन शाह यांनी उद्विग्नता व्यक्त केली होती. समाजात धर्माच्या नावाखाली द्वेषाची भिंत उभी करण्यात येत आहे आणि त्याविरोधात उभे राहणाऱ्यांना शिक्षा केली जात आहे, निष्पापांचा जीव घेतला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांना कोठडीत डांबण्यात येत असून कलावंत, अभिनेते, विचारवंत, कवी यांना मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. पत्रकारही गप्प आहेत’, असे त्यांनी म्हटले आहे. दोन मिनिटे १३ सेकंदांच्या या व्हिडिओत नसीरुद्दीन शाह हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांना कोठडीत डांबण्यात येत आहे असे विधान करत असताना सुधा भारद्वाज व अन्य मंडळींची छायाचित्र दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या व्हिडिओतून नसीरुद्दीन शाह यांनी शहरी नक्षलवादाला पाठिंबा दिल्याची टीका सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
In 2018, India witnessed a massive crackdown on freedom of expression and human rights defenders. Let's stand up for our constitutional values this new year and tell the Indian government that its crackdown must end now. #AbkiBaarManavAdhikaar pic.twitter.com/e7YSIyLAfm
— Amnesty India (@AIIndia) January 4, 2019
नसीरुद्दीन शाह यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. शहरी नक्षलवाद्यांना नसीरुद्दीन शाह कसे काय पाठिंबा देऊ शकतात, असा सवाल अनेक युजर्सनी विचारला. #NaseerForNaxals हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिगमध्ये होता. आता या टीकेवर नसीरुद्दीन शाह काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Amnesty International had earlier supported and endorsed the efforts of terrorist-separatist Yaseen Mallik and today it endorses #NaseeruddinShah…. so is Shah the new Yasin Malik? #NaseerForNaxals #NaseeruddinBacksAmnesty
— Ashoke Pandit (@ashokepandit) January 4, 2019
#NaseerForNaxals Its proven that @NaseerudinShah is a bigots, an #UrbanNaxals, an anti-Nationals, a part of #TukdeTukdeGang whose only motto is to break and malign image of India. #Amnesty is a known anti-India organization. pic.twitter.com/5XiU4sBCMg
— Arvind Vishwakarma (@ArvindVishwak10) January 4, 2019
दरम्यान, अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्यांनी सत्य सांगू नये म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले जात आहेत, त्यांचे परवाने रद्द केले जात आहेत आणि बँक खातीही गोठवण्यात येत आहेत, असेही शाह यांनी म्हटले आहे.