बिहारमध्ये वारंवार घडणाऱ्या हूच दुर्घटनांवर टीका करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल दारू पिणाऱ्या लोकांना महापापी म्हटलं आहे आणि विषारी दारूच्या सेवनानंतर मृत्युमुखी पडणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असं सांगितलं.

महात्मा गांधींनीही दारू पिण्यास विरोध केला होता आणि जे त्यांच्या तत्त्वांच्या विरोधात जातात ते ‘महापापी आणि महायोग’ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी या लोकांना भारतीय मानत नाही. दारू पिणे हानिकारक आहे हे माहीत असूनही लोक हूचचे सेवन करतात आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांना ते जबाबदार आहेत, राज्य सरकार नाही. चूक त्यांची आहे. दारू विषारी असते हे माहित असूनही ते दारुचं सेवन करतात, असंही ते म्हणाले.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!


बिहार विधानसभेने काल राज्यात प्रथमच गुन्हेगारांसाठी दारूबंदी कमी कडक करण्याचा प्रयत्न करणारे एक दुरुस्ती विधेयक सादर केल्यानंतर आणि मंजूर केल्यानंतर नितीश कुमार यांनी हे विधान केलं. राज्य सरकार दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्यामुळे बिहारमध्ये हूच दुर्घटना होत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना ते उत्तर देत होते.


बिहार प्रतिबंध आणि अबकारी (सुधारणा) विधेयक, २०२२ ला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर, प्रथमच गुन्हेगारांना दंड जमा केल्यानंतर ड्युटी मॅजिस्ट्रेटकडून जामीन मिळेल. पण जर ती व्यक्ती ती भरण्यात अयशस्वी ठरली तर त्याला किंवा तिला एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. २०२१ च्या शेवटच्या सहा महिन्यांत ६० हून अधिक लोकांचा बळी घेणार्‍या राज्यातील हुच दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांवर आघाडीचा भागीदार भाजपा आणि विरोधी राजद या दोन्ही पक्षांकडून हल्ला झाला आहे.