हिमालयातील प्रपातात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरूच आह़े  येथील ९० धर्मशाळांमध्ये थांबलेले हजारो पर्यटक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आह़े  आतील अनेक लोक बेपत्ता आहेत़  त्यामुळे मृतांचा आकडा वाढून हजाराचा आकडा गाठण्याची शक्यता आह़े  गुरुवारीही बचावकार्य वेगाने सुरू होत़े  भारतीय वायुदलाचे एक अतिरिक्त हेलिकॉप्टरही केदारनाथ भागात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले आह़े
केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राने पाठविलेल्या अहवालात वाहून गेलेल्या धर्मशाळांची माहिती देण्यात आली आह़े  तरीही मृतांचा अधिकृत आकडा अद्याप १५० असल्याचेही सांगण्यात आले आह़े  येथील वातावरण आता निवळले असल्यामुळे बचावकार्य पूर्ण वेगाने सुरू करण्यात आले आह़े  येथे अत्यंत अवघड ठिकाणी अडकलेल्या ६०० पर्यटकांना सोडविण्यासाठी वायुदलाची दोन आणि राज्य शासनाची हेलिकॉप्टर प्रयत्न करीत आहेत़
उत्तराखंडमधील केदारनाथ आणि गोविंदघाट येथे अडकलेल्या १५ हजार लोकांची वायू आणि खुष्कीच्या मार्गाने मुक्तता करण्यात आल्याचे पोलीस महानिरीक्षक आऱ एस़ मीना यांनी सांगितल़े  संपूर्ण बचावकार्य १२ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने करण्यात येत होत़े  त्यात आणखी ८ हेलिकॉप्टरची भर घालण्यात आल्याची माहिती मीनी यांनी दिली.बचावकार्य सध्या केदारनाथ मंदिर आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यातील इतर भागांभोवती केंद्रित करण्यात आले आह़े  या भागातील ९० धर्मशाळा वाहून गेल्याने येथे जीवितहानीचा अधिक धोका आह़े या प्रपातात अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत़  त्यांचा अजून पत्ताही लागलेला नाही़  त्यामुळे मृतांच्या आकडय़ाबाबत अनिश्चितता असल्याचेही मीना यांनी सांगितल़े हिमाचलमधील कन्नूर जिल्ह्यातील आदिवासी भागात अडकलेल्या ६०० जणांसाठी सकाळी साडेसहा वाजता बचावकार्य सुरू झाले आणि गेल्या पाच दिवसांपासून तेथे अडकलेल्यांची वायूमार्गे सुटका करून त्यांना रामपूर येथे सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितल़े

बचावकार्यात अडथळे
उत्तराखंडचे पोलीस उपनिरीक्षक सत्यव्रत बन्सल यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आल़े  मात्र पाच यात्रेकरूंना गुप्तकाशीहून देहरादूनला सुखरूप आणण्यात आले आह़े  मृतांच्या आकडय़ाबाबत विचारले असता, त्यांनी निश्चित आकडा सांगण्यात असमर्थता दर्शविली आणि अडकलेल्यांना सोडविण्यात प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केल़े

रामदेव मदतीला धावले
योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली योगपीठ या संस्थेने पाच ट्रक खाद्यान्न, औषधे आणि चादरी असे सामान देहरादूनमधील जॉली ग्रॅण्ड विमानतळावर पोहोचविले आह़े  तेथून ते वायू दलाच्या हॅलिकॉप्टरने संकटग्रस्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

कानपूरमधील अनेक जणांशी अद्याप संपर्क नाही
उत्तराखंडच्या प्रपातात अडकलेल्या कानपूर शहरातील सुमारे चोवीस जणांशी त्यांच्या कुटुंबीयांचा अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही़  त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नसल्याचे देहरादून जिल्हा प्रशासनाने सांगितले आह़े
जिल्हा प्रशासन या चोवीस जणांबाबत समाधानकारक माहिती देऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी स्वत:च त्यांचा शोध घेण्याचे ठरविले आह़े  येथील सनदी लेखापाल (सीए) मुकेश श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील १६ जणांबद्दल गेल्या तीन दिवसांपासून कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे ते चिंतेत आहेत़  
शहरातील बारा मोहल्ला भागात राहणारे राम भट्ट यांच्याही कुटुंबातील दोघे पुरात वाहून गेले आहेत़  तर शहरातील बिनू शुक्ला यांचाही अद्याप पत्ता लागलेला नाही़

Story img Loader