गेल्या रविवारी कॅनडामध्ये एक पिक अप ट्रक गर्दीत घुसवून चार जणांच्या मुस्लिम कुटुंबाला ठार मारण्यात आल्यानंतर त्यांच्या शुक्रवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मोर्चा काढत या घटनेचा निशेष नोंदवला. कॅनडामध्ये एका मुस्लिम कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे. गेल्या रविवारी एक पिकअप ट्रक नियम तोडून रस्त्यावर आला आणि मुस्लिम कुटुंबाच्या अंगावर घालून हत्या केली. इस्लामविरोधात द्वेष असल्याने जाणुनबुजून अंगावर वाहन घालून ही हत्या करण्यात आल्याचं कॅनडा पोलिसांनी सांगितलं होते.

या हल्ल्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सलमान अफजल (वय ४६), त्याची पत्नी मदिना (वय ४४), त्यांची कन्या युम्ना (वय १५), आजी (वय ७४) यांचा समावेश आहे. एका मुलाला रुग्णालयात दाखल केले असून त्याचे नाव फैयाझ असे आहे. मुस्लिम, कॅनडेयिन व पाकिस्तानी अशी बहुविध ओळख असलेले हे आदर्श कुटुंब होते. यामध्ये फक्त कुटुंबातील ९ वर्षांचा मुलगा बचावला आहे.

कॅनडात ‘इस्लामभया’तून कुटुंबास वाहनाखाली चिरडले

या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी लंडन, ओंटारियोमधील लोकांनी जिथे ही घटना घडली तिथपासून ७ किलोमीटर पर्यंत मोर्चा काढला होता. ‘द्वेषाला येथे जागा नाही’ असे संदेश असलेले फलक काहींनी हातात पकडले होते. कॅनडाच्या अन्य शहरांमध्येही असे मोर्चे काढण्यात आले होते.

मृतांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या भावना

ते त्यांच्या क्षेत्रात चांगले काम करीत होते. मुलेही शाळेत अग्रस्थानी होती. वडील हे सायकोथेरपिस्ट होते. त्यांना क्रिकेटची आवड होती. पत्नी वेस्टर्न युनिव्हर्सिटी लंडन या संस्थेत नागरी अभियांत्रिकीत पीएचडी झालेली होती. मुलगी नववीला होती तर आजी त्या कुटुंबाचा मानसिक आधार होती. इस्लामभयापासून मुस्लिमांना वाचवण्याची गरज आहे, असे त्यांच्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांनी म्हटले आहे. तरुण व्यक्तीने केलेले हे कृत्य एखाद्या गटाच्या विचारसरणीनुसार केलेले असून तो दहशतवादाचा भाग आहे. त्याविरोधात ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. असे त्यांनी सांगितले.

हल्लेखोर द्वेषमूलक गटाचा सदस्य?

हल्लेखोर नॅथॅनिएल व्हेल्टमन (वय २०) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, व्हेल्टमन हा ‘लंडन’ चा रहिवासी असून तो ज्यांना मारले त्यांना ओळखत नव्हता. हल्लेखोर हा एखाद्या द्वेषमूलक गटाचा सदस्य होता असे अजून निष्पन्न झालेले नाही, असे गुप्तचर गटाचे अधीक्षक पॉल वेट यांनी म्हटले आहे  पोलीस प्रमुख स्टीफन विल्यम्स यांनी सांगितले की, मुस्लिम असल्यानेच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

Story img Loader