दुबई आणि चीनमध्ये नोकरी लावून देतो असं सांगून हजार तरुणांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या एका टोळीविरोधात सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सायबर क्राईम पोलिसांनी गुरुवारी दिल्ली, गुरुग्राम आणि फतेहाबाद येथील बाह्य-उत्तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यावेळी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
या आरोपींनी दिल्ली एनसीआरसह आसपासच्या भागातील तरूणांना परदेशातल्या नोकरीचं अमिष दाखवलं होतं. चीन आणि दुबई येथे ऑनलाईन नोकऱ्या देण्याच्या नावाखाली हजारो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. चीन आणि दुबई येथील आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या सहभागाने हे कारस्थान रचल्याची माहिती बाह्य उत्तर जिल्ह्याच्या सहाय्यक पोलीस उपायुक्तांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.