वाढतं औद्योगिकीकरण, प्रदूषण, जंगलतोड तसेच पर्यावरणावरील मानवी अतिवापरामुळे वातावरणात बदल घडून येत आहे. वातावरण बदल आरोग्यासाठी धोकादायक असून त्याच्या संरक्षणासाठी जपान, फ्रान्स, बेल्जियम, स्विजरलँडमध्ये आंदोलने करण्यात येत आहेत. शुक्रवारी बेल्जियमच्या रस्त्यावर हजारो विद्यार्थी उतरले होते. त्यामुळे अनेक शाळा कॉलेज बंद होती.

शुक्रवारी बेल्जियमच्या रस्त्यावर दहा हजारांपेक्षा आधिक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. वातावरणाच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले होते. जगभरातील वातावरणाची पातळी खालावली असून सध्या नाजूक अवस्थेत आहे. त्याच्या संरक्षणासाठी कडक पावले उचलण्यात यावी म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पाऊस आणि थंडीला न जुमानता विद्यार्थी या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले होते.

वातावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन केले आहे. “School strike 4 Climate” आणि “Skipping school? अशा प्रकराचे बोर्ड हातात धरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. चांगल्या भविष्यासाठी लढत आहोत , त्यामुळेच आंदोलन करत आहे. अशा प्रकारचे बॅनर अनेक विद्यार्थ्यांच्या हातात दिसत आहेत. काही शाळांनी या आंदोलनाचे महत्व समजून पाठिंबाही दर्शवला आहे.

शिक्षण तरूणांना समजूतदार आणि कर्तव्यनिष्ट नागरिक घडवते, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हे स्पष्ट झाल्याचे मत स्थानिक शाळेतील संचालक पॅट्रिक लँकस्वेरड यांनी व्यक्त केले आहे. आपण अन्य कोणत्या गृहावर रहायला जावू शकत नाही आपल्याला पृथ्वीवरच रहायचे आहे. त्यामुळे येथील वातावरणाची काळजी आपणच घेतली पाहिजे, आणि त्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजे असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

Story img Loader