देशात बनावट धमकीचं सत्र अद्यापही संपलेलं नाही. दिल्लीतील १०० शाळांना धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानंतर १२ मे रोजी १३ विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला रविवारी १३ विमानतळे उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. ईमेलनुसार तत्काळ शोध मोहिमही सुरू करण्यात आली. परंतु, तपासादरम्यान काहीही संशयास्पद आढळलं नाही. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

लखनौच्या चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, भोपाळ, पाटणा, जम्मू आणि जयपूर विमानतळांवर बॉम्बच्या भीतीने दहशत निर्माण झाली. तपासणीनंतर, बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीने (Bomb Threat Assessment Committee) धमकी ‘नॉन-स्पेसिफिक’ म्हणून घोषित केली.

parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान

“चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनौ आणि इतर विमानतळांवर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी स्फोटक उपकरणांबाबत धमकीचा ई-मेल आला. सीसीएसएआय विमानतळाच्या सुरक्षा पथकाने संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी केली. तपासणीनंतर बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीने ‘नॉन-स्पेसिफिक’ म्हणून जाहीर केले”, असं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने सांगितले. तपासणी आणि स्क्रिनिंग व्यतिरिक्त, लखनौ विमानतळ प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अतिरिक्त पावले उचलत आहे, असेही त्यात म्हटले आहे.

दिल्लीतील रुग्णालयातही धमकीचे मेल

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) आणि १० हून अधिक रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. दिल्ली पोलिसांनी नंतर सांगितले की ही धमकी फसवी होती आणि ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास करण्यात आला.

दिल्लीत १०० शाळांनाही मिळाली होती धमकी

या महिन्याच्या सुरुवातीला, दिल्लीतील सुमारे १०० शाळा, नोएडामधील दोन आणि लखनऊमध्ये एका शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. रशियन ईमेल सेवा वापरून या धमक्या पाठवण्यात आल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं होतं.

Story img Loader