मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली होती. भोपाळमधील एका तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखं भुंकायला लावलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. तर, आरोपींची घरे मध्य प्रदेश सरकारने जमीनदोस्त केली आहेत.
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात टोळक्याने एका तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधत कुत्र्यासारखं भुंकायला लावलं होतं. तसेच, टोळीतील सदस्यांनी अंमली पदार्थांचे सेवन करून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केला होता.
हेही वाचा : तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखं भुंकायला लावलं; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल
याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नाराजी व्यक्त केली होती. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी समीर खान आणि अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींची घरे राष्ट्रीय सुरक्षा कलमांतर्गत ( एनएसए ) जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा : ट्रॅव्हल एजंटनं बहिणीलाच ओमानमधल्या शेखला विकलं; पीडितेनं सांगितले शेकडो महिलांचे हाल
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की, “तरुणाचा व्हिडीओ पाहिला आहे. अशी वागणूक देणं दुर्दैवी आहे. भोपाळ पोलीस आयुक्तांना व्हिडीओची सत्यता तपासून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.”