पीटीआय, नवी दिल्ली : मध्य प्रदेशात तिघांना अटक करून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयसिस या दहशतवादी गटाशी संलग्न एक दहशतवादी मॉडय़ुल उद्ध्वस्त केले आहे.  गुप्तचर विभागाच्या नेतृत्वात मध्य प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकासोबत (एटीएस) राबवलेल्या संयुक्त मोहिमेत जबलपूरमधील १३ ठिकाणी रात्रभरात छापे घालण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली, असे एनआयएच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सैयद मन्सूर अली, मोहम्मद आदिल खान व मोहम्मद शाहीद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, त्यांना भोपाळ येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती या प्रवक्त्याने दिली. अनेक धारदार शस्त्रे, बंदी घातलेल्या बोअरसह दारूगोळा, आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे या छाप्यांमध्ये जप्त करण्यात आल्याचेही प्रवक्त्याने सांगितले. खान याच्या आयसिसधार्जिण्या कारवाया गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एनआयएच्या निदर्शनास आल्या  होत्या. त्यांचा तपास केल्यानंतर या यंत्रणेने २४ मे रोजी गुन्हा दाखल केला होता.