बंगळुरू येथे १७ एप्रिल रोजी भाजप कार्य़ालयाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी तामिळानाडू येथे तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक पोलिसांनी त्यांच्या तामिळनाडूमधील हस्तकांच्या सहाय्याने काल (सोमवार) रात्री उशीरा ही कारवाई केली, ज्यामध्ये पीर मोहीदीन आणि बशीर या दोघांना तिरूनेलवेली येथील एका लॉजवरून ताब्यात घेण्यात आले. तिस-या व्यक्तीला मदुराई येथून अटक करण्यात आली. या तिघांनी स्फोट घड़वून आणला, असे सांगतानाच पोलिस म्हणाले की अद्याप मुख्य आरोपी कोण याचा सुगावा लागायचा आहे.
याच प्रकरणी चार जणांची तुकतीच केरळ येथे चौकशी करण्यात आली होती. तामिळनाडू येथे अटक करण्यात आलेल्या तिघांना पुढील चौकशीसाठी बंगळुरू येथे नेण्यात आल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे. सदर स्फोटाला जबाबदार असणा-या व्यक्तींची माहिती पुरवणा-यांना कर्नाटक सरकारने पाच लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

Story img Loader