झिका विषाणू प्राणघातक नसला, तरी त्याची लागण झाल्याने गिलेन बॅरे नावाचा चेतासंस्थेचा आजार होऊन तीन जणांचा कोलंबियात मृत्यू झाला आहे. झिका या डासांमुळे पसरणाऱ्या विषाणूमुळे तीन जण दगावल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रथमच जाहीर केले आहे. आतापर्यंत झिकामुळे मृत्यू झाल्याचे कुणी सांगितले नव्हते. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या प्रमुख मार्था लुसिया ऑसपिना यांनी सांगितले, की झिकामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात रुग्णांना झिकामुळे गिलेन बॅरे आजार झाला. हा दुर्मीळ रोग असून त्यामुळे आपलीच प्रतिकारशक्ती प्रणाली मेंदूच्या चेतासंस्थेवर हल्ला करते. यात अशक्तपणा व पक्षाघात होतो. झिका विषाणू सध्या लॅटिन अमेरिकेत वेगाने पसरत आहे.
झिका विषाणुंमुळे कोलंबियात तिघांचा मृत्यू
झिका या डासांमुळे पसरणाऱ्या विषाणूमुळे तीन जण दगावल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रथमच जाहीर केले आहे.
First published on: 08-02-2016 at 00:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three deaths in colombia by zika virus