सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वायुसेना भवन जवळ दिल्ली पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन शेतकऱ्यांना अटक केली. लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करून तिघेही ओपन जिप्सीमध्ये जात होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना रोखले. चौकशीनंतर लॉकडाउनच्या उल्लंघनाच्या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आयपीसीच्या कलम १८८ नुसार त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतक शेतकऱ्यांना जामीनावर सोडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी बंगला साहिब गुरुद्वारा येथे थांबले होते. त्यानंतर ते वायुसेनेच्या इमारतीजवळून जात होते. ते सिंधू सीमेच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी सांगितले. जेथे मागील सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु पोलिसांनी त्यांना अडवून विविध कलमांतर्गत अटक केली.

लॉकडाउनमध्ये वायुसेना भवन जवळील मार्गाने प्रवेश करणे हे एक मोठे दुर्लक्ष आहे. कारण संसद भवन वायुसेना भवनाच्या अगदी जवळ आहे. लॉकडाउन दरम्यान शेतकरी येथे पोहोचणे ही मोठी चूक मानली जाते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर कारवाई केल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, ते मध्य दिल्लीतील बांगला साहिब गुरुद्वारा येथे प्रार्थना करण्यासाठी आले होते आणि गेले दोन दिवस तिथेच थांबले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी म्हणाले “आम्ही सिंधू सीमेच्या दिशेने जात होते. परंतु मध्य दिल्लीत कृषी कायद्याचा निषेध करण्याचा त्यांचा हेतू नव्हता.”