अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. रविवारी इंडियानामधील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. AFP च्या वृत्तानुसार, शस्त्र बाळगणाऱ्या एका सामान्य नागरिकाने गोळी घालून हल्लेखोराला ठार केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये हा गोळीबार झाला.

ग्रीनवूड पोलीस विभागाचे प्रमुख जिम इसॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. “पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मी थेट कमांड पोस्टच्या चर्चेत असून, सध्या कोणताही धोका नाही,” अशी माहिती मेयर मार्क यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिली आहे.

पोलीस प्रमुखांच्या माहितीनुसार, संध्याकाळी ६ वाजता मॉलमधील फूड कोर्टमध्ये गोळीबार होत असल्याचे फोन कॉल सेंटरमध्ये येऊ लागले होते. हल्लेखोराकडे एक मोठी रायफल होती. दरम्यान शस्त्रधारी एका सामान्य नागरिकाने गोळी घालून या हल्लेखोराला ठार केलं. या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता यासंबंधी पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader