पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीमध्ये शुक्रवारी रात्री आलेल्या वादळाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आणि २३ जण जखमी झाले. जोरदार वादळी वाऱ्यांमुळे दिल्लीत ठिकठिकाणी झाडे पडणे, विजेचे खांब पडणे आणि भिंती अंशत: कोसळणे अशा प्रकारच्या घटना घडल्या. तसेच धुळीच्या वादळामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला.

शाहीन बाग येथे इमारतीची भिंत अंशत: कोसळून शिरीन अहमद ही १९ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित इमारतीच्या सर्वात वरील मजल्याच्या मालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत होणे) आणि कलम २२८ (इमारत पाडताना किंवा दुरुस्त करताना निष्काळजी वर्तन) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पश्चिम दिल्लीतील विकासपुरी येथे जानकीपुरी उड्डाणपुलाजवळ दुचाकीवर झाड पडल्यामुळे एक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. क्रेनच्या मदतीने झाड हटवून जयप्रकाश या जखमी दुचाकीस्वाराला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अन्य एका घटनेमध्ये के एन काट्जू मार्ग येथे एका ४६ वर्षीय हरिओम या मजुरावर झाड कोसळून त्याचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed in delhi due to storm amy
Show comments