रशियन आर्मीत काम करण्यासाठी पाठवण्यात आलेले कर्नाटकमधील तीन तरूण पुन्हा भारतात परतले आहेत. या तिघांना भारतातील एजंटने सुरक्षा रक्षकाची नोकरी देतो, असं सांगून रशियात पाठवलं होतं. रशियातून परत आल्यानंतर आता या तरुणांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांची आपबिती सांगितली. सय्यद इलियास हुसैनी, मोहम्मद समीर अहमद आणि सुकैन मोहम्मद अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांना परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने भारतात परत आणण्यात आलं आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील काही एजंटने कर्नाटकातील तीन तरुणांना रशियात सुरक्षा रक्षकाची नोकरी देतो, असं सांगून त्यांची फसवणूक केली होती. तसेच त्यांना महिन्यांना ७० हजार रुपये दिले जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. त्यांना गेल्या डिसेंबर महिन्यात रशियात पाठवण्यात आलं. मात्र, ज्यावेळी तिघेही रशियात दाखल झाले, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

PM Narendra Modi Benjamin Netanyahu
Israel-Hamas War : “गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी भारताला…”, राजदूतांना मोठी अपेक्षा; म्हणाले, “भारत पश्चिम आशियात…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Faridabad News
Faridabad : Video : पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्यात घातली अन् घडली दुर्दैवी घटना; बँकेच्या मनेजरसह एकाचा बुडून मृत्यू
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Bandra Worli Sea-Link tiepl
Mumbai Accident : वांद्रे-वरळी सी-लिंकवर शर्यतीच्या नादात भीषण अपघात; BMW व Mercedes च्या धडकेत टॅक्सी उलटली
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन

हेही वाचा – Ajit Doval Meets Putin : मॉस्कोत अजित डोवाल-पुतिन भेट; रशियाच्या अध्यक्षांचं भारत व मोदींबाबत मोठं वक्तव्य, युक्रेनबद्दल म्हणाले…

यासंदर्भात बोलताना २४ वर्षीय सय्यद इलियास हुसैनी म्हणाला, “आम्ही १९ डिसेंबर २०२३ रोजी रशियातील मॉस्को येथे दाखल झालो होते. त्यावेळी विमानतळावर आम्हाला मोईन खान नावाची एक भारतीय व्यक्ती घ्यायला आली. त्याने आम्हाला त्याच्या रुमवर नेलं. दोन दिवसांनी रशियन आर्मीचे काही अधिकारी साध्या वेशात त्याठिकाणी आले. त्यांनी आम्हाला एका दुसऱ्या हॉटेलमध्ये नेलं. आम्हाला नवीन सीम कार्ड आणि एटीएम कार्ड देण्यात आले. तिथून आम्हाला एका ऑफीसमध्ये नेण्यात आलं. तिथे आमच्याकडून काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करून घेण्यात आली. आम्ही स्वाक्षरी केलेली कागदपत्रे रशियन भाषेत होती. आम्ही अॅपद्वारे ते भाषांतर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही. ज्यावेळी मी आमच्या एजंटला विचारलं तेव्हा त्याने अर्टी-शर्थी असल्याचे म्हणत स्वाक्षरी करण्यास सांगितले.”

यावेळी बोलताना मोहम्मद समीर अहमद याने सांगितलं, की “कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर आम्हाला मॉस्कोवरून ४०० किलोमीटर दूर एका ठिकाणी नेण्यात आलं. तिथे आमचे पासपोर्ट आणि मोबाईल जप्त करण्यात आले आणि आम्हाला रशियन आर्मीचा युनिफॉर्म देण्यात आला. त्यानंतर आम्हाला एका विमानात बसवून युक्रेनच्या सीमेवर नेण्यात आलं. तिथे आम्हाला एका महिना शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं. यादरम्यान आम्हाला मोबाईल वापरण्याची परवानगी नव्हती. आम्ही आमच्या परिवारालादेखील संपर्क करू शकत नव्हतो.”

हेही वाचा – ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ क्षेपणास्त्र किती घातक? युक्रेनला या क्षेपणास्त्राने रशियावर हल्ला करण्याची परवानगी का नाही?

पुढे बोलताना तो म्हणाला, “ट्रेनिंगनंतर फेब्रुवारी महिन्यात आम्हाला युद्धभूमीवर पाठवण्यात आलं. तिथे आम्हाला १४ तास काम करावं लागतं होतं. आम्ही जंगलात राहत होतो. तिथे आम्हाला मोबाईल देण्यात आले. तेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करून या सगळ्याची माहिती दिली. तसेच रशियातील भारतीय दुतावासाला फोन केला.”

सय्यद इलियास हुसैनी म्हणाला की, “युक्रेनच्या एका ड्रोन हल्ल्यात गुजरातची हेमिल मंगुकिया नावाची एक व्यक्ती मारली गेली. त्याचा मृत्यू आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितला. त्यानंतर आम्ही जिवंत कधी भारतात जाऊ ही अपेक्षा सोडली होती. आम्ही युद्धात सहभागी होण्यास नकार दिला, तेव्हा आमच्यावर दबाव आणला गेला. त्या जंगलात आम्ही जीव मुठीत घेऊन जगत होतो.”

दरम्यान, रशियातून झालेल्या सुटकेबाबत बोलताना सय्यद इलियास हुसैनीने सांगितलं की, “पंतप्रधान मोदी यांच्या रशिया भेटीनंतर तिघांनाही आशेचा किरण दिसू लागला होता. या भेटीनंतर त्यांच्या कमांडिंग ऑफिसरला फोन आला, सर्व भारतीयांना सेवेतून मुक्त करा आणि मुख्यालयात परत पाठवा, असं सांगण्यात आलं. त्यानंतर आम्हाला परत मॉस्कोला येथे आणण्यात आलं आणि नंतर दिल्लीला पाठवण्यात आलं”. आम्ही या सगळ्यातून कसं वाचलो याचा विचार करूनही आजही थरकाप होतो, असेही त्याने सांगितलं.

हेही वाचा – इराणने रशियाला दिले महाविध्वंसक क्षेपणास्त्र, अमेरिका-युक्रेनच्या चिंतेत वाढ; ‘Fath-360’ क्षेपणास्त्र किती घातक?

महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवड्यात या तिघांशिवाय आणखी सहा भारतीयांना देशात परत आणण्यात आलं. यामध्ये तेलंगणाच्या चार तसेच काश्मीर आणि कोलकाताच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.