ब्रिटनमधून इसिसच्या जिहादी लढय़ात सामील होण्यासाठी पळालेल्या तीन मुली सीरियाची सीमा ओलांडून गेल्या आहेत, अशी माहिती ब्रिटिश पोलिसांनी दिली. या मुली टर्कीकडे जाणाऱ्या विमानात बसून निघून गेल्या होत्या. इसिसच्या लढय़ात सामील होण्यासाठी गेलेल्या या मुली चार किंवा पाच दिवसांपूर्वीच तिकडे पोहोचल्या आहेत व आता त्या इसिसमध्ये सामील होतील, असे बीबीसीचे वृत्त आहे.
महानगर पोलिसांनी सांगितले की, आता या मुली टर्कीत नाहीत व सीरियाची सीमा पार करून गेल्या आहेत. असे असले तरी टर्कीश अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असून तपास चालू आहे. यापूर्वी स्कॉटलंड यार्डने या मुली टर्कीत आल्याचे तीन दिवस उशिरा सांगितले असा आरोप टर्कीचे उपपंतप्रधान ब्युलेंट अरिन्क यांनी केला होता.
 महानगर पोलिसांनी म्हटले आहे की, टर्कीश अधिकाऱ्यांनी या मुली बेपत्ता झाल्यानंतर व शहानिशा केल्यानंतर एक दिवसाने संपर्क साधला होता. शमीमा बेगम, अमायरा अबेस (दोघी वय१५) व कादिझा (वय १६ ) या तिघी १७ फेब्रुवारीला इस्तंबूलला गेल्या. त्या टर्कीश एअरलाइन्सच्या विमानात गॅटविक विमानतळावरून बसल्या. त्यांना त्या देशात जाण्यासाठी व्हिसा आवश्यक होता.
अरिन्क यांनी सांगितले की, ब्रिटनने या तीन मुलींना जाऊ दिले, त्या इस्तंबूलला आल्या व नंतर तीन दिवसांनी आम्हाला कळवण्यात आले, ब्रिटनने त्याची काळजी घ्यायला हवी होती. त्यांना पकडता आले असते तर चांगलेच झाले असते पण आम्ही पकडू शकलो नाही, जर आम्ही पकडू शकलो नाही तर त्याची जबाबदारी आमची नाही तर ब्रिटनची आहे कारण त्यांनी माहिती उशिरा दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा