पक्षाचे विजयी उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र देण्यात आले असल्याने आपला अपक्ष आमदार असा उल्लेख करू नये, अशी विनंती झारखंडमधील तीन आमदारांनी मीडियाला केली आहे.
मार्क्‍सवादी समन्वय समितीच्या तिकिटावर आपण निवडणूक लढविली असून, निवडणूक आयोगाकडून पक्षाच्या नावाचे प्रमाणपत्र आपल्याला मिळाले आहे आणि एकेकाळी आपल्या पक्षाचा एक खासदार आणि पाच आमदार असल्याने पक्ष नोंदणीकृत आहे, असे आमदार अरूप चॅटर्जी यांनी म्हटले आहे.
झारखंड जनाधिकार मंचचे आमदार बंधू तिर्की आणि झारखंड पार्टीचे आमदार इनोस इक्का यांनीही आपण पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपल्यालाही अपक्ष आमदार म्हणून संबोधण्यात येऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.
मीडियाने या तीन आमदारांना अपक्षांच्या यादीत स्थान दिल्याने सदर आमदारांनी हे स्पष्टीकरण केले आहे. आपण २००९ च्या निवडणुकीत गेल्या सरकारला पाठिंबा जाहीर करताना पक्षाचे आमदार म्हणूनच पत्र दिले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा