जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवानही शहीद झाला आहे. ठार झालेले तीनही दहशतवादी पाकिस्तानचे होते. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून अनेक शस्त्रे जप्त केली आहेत.
दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त
काश्मीर पोलीस झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांचा हवाला देत त्यांनी ट्विट केले, ‘तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. यादरम्यान चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवानही शहीद झाला. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.