Ludhiana Woman Gangrape : उत्तर प्रदेशात राहणाऱ्या तिघांनी लुधियाणातील महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेच्या भावानं एक मुलीबरोबर प्रेमविवाह केला होता. याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी दुष्कृत्य केलं आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर लुधियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
१ मे रोजी घडली घटना
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १ मे रोजी घडली. आरोपी हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. रविंदर सिंह, अमन सिंह आणि संतोष सिंह, अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. यापैकी रविंदर सिंह हा मुख्य आरोपी असून त्याचा मुलीचे पीडित महिलेच्या भावाशी प्रेम संबंध होते. मात्र, आरोपीला त्यांचा प्रेमविवाह मान्य नव्हता. तो तिच्या मुलीसाठी दुसरीकडे स्थळ शोधत होता. मात्र, त्यापूर्वी त्याच्या मुलीने प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न केले.
हेही वाचा – कुरिअरद्वारे नशेबाजांना घरपोहोच अमली पदार्थ; विश्रांतवाडी अमली पदार्थ प्रकरणात कुरिअर कर्मचारी गजाआड
घरी कुणी नसल्याचा फायदा घेत महिलेवर सामूहिक बलात्कार
या प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या आरोपीने मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो परिवारातील सदस्यांसह लुधियानातील पीडित महिलेच्या घरी पोहोचला. यावेळी ती महिला घरात एकटीच होती. आरोपीने तिच्याकडे आपल्या मुलीबाबत विचारणा केली. मात्र, मला काहीही माहिती असं तिने सांगितले. त्यामुळे आपल्या मुलीला महिलेच्या भावाने पळवून नेल्याचा बदला म्हणून त्यांनी महिलेवर बलात्कार केला. तसेच या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. जर याबाबत कुठे वाच्यता केली, तर व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करेन, अशी धमकीही त्यांनी या महिलेला दिली.
दरम्यान, या घटनेमुळे मानसिक तणावात गेलेल्या या महिलेने दोन महिने याबाबत कुणालाही सांगितले नाही. अखेर गेल्या आठवड्यात तिने यासंदर्भात लुधियाणा पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून ते आरोपींचा शोध घेत आहे.