श्रीनगरमध्ये पाच हाऊसबोट जळून खाक झाल्या आहेत. दाल लेक या ठिकाणी या हाऊसबोट उभ्या होत्या. त्यांना आग लागली. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं. या घटनेत अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. तसंच बांगलादेशच्या तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याचंही समजतं आहे.
ज्या तीन बांगलादेशी प्रवाशांचा जळून मृत्यू झाला ते तिघेजण सफीना या हाऊसबोटवर होते. या हाऊसबोट्सना जी आग लागल्याची घटना घडली त्या घटनेत हे पर्यटकही सापडले. त्या सगळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. आज पहाटे सगळ्या हाऊस बोट्सना आग लागल्याची घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाट क्रमांक ९ या ठिकाणी ज्या हाऊस बोट उभ्या होत्या तिथे आग लागली. एका हाऊसबोटला लागलेली आग तातडीने पसरली आणि पाच हाऊसबोट जळून खाक झाल्या आणि त्यातले पर्यटकही. सफीना या हाऊस बोटमध्ये असलेल्या तीन बांगलादेशी पर्यटकांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग नेमकी का लागली ते समजू शकलेलं नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तीन बांगलादेशी पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.