Rape on Three Year Girl : तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकरणात शाळेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. नोएडा येथील एका खासगी शाळेत ही घटना घडली आहे. ज्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली तो मूळचा निठारी येथील आहे. त्याला कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आलं होतं. तीन वर्षांच्या मुलीवर याच स्वच्छता कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे.

काय घडली घटना आणि नेमकी कधी घडली ही घटना?

नोएडा येथील एका खासगी शाळेत ही घटना ९ ऑक्टोबरला घडली आहे. या स्वच्छता कर्मचाऱ्याने तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले आणि नंतर तिला मारहाण केली असा आरोप आहे. या घटनेनंतर या मुलीला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. कारण ही घटना घडल्यानंतर ही मुलगी घरात शांत राहू लागली. काय घडलं आहे ते तिला समजत नव्हतं आणि ती काहीही बोलू शकत नव्हती. तसंच तिला पोटाच्या खालच्या भागात दुखू लागलं. ज्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांकडे नेण्यात आल्यानंतर या गोष्टीची माहिती समोर आली.

पीडितेच्या पालकांनी काय सांगितलं?

पीडितेच्या पालकांनी पोलिसांकडे जी तक्रार दिली त्यानुसार त्यांनी मुलीला डॉक्टरांकडे नेलं होतं. डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जखमा असल्याचं ( Rape on Three Year Girl ) सांगितलं. तसंच तिचं लैंगिक शोषण ( Rape on Three Year Girl ) झाल्याचंही सांगितलं. या सगळ्या प्रकारानंतर भेदरलेल्या मुलीनेही तिच्याबरोबर काय घडलं ते तिच्या पालकांना सांगितलं. स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या माणसाने तिला काय केलं ( Rape on Three Year Girl ) ते तिने पालकांना सांगितलं तसंच त्यामुळे घाबरुन गेल्याचंही ही मुलगी म्हणाली आणि त्यानंतर पालकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. तसंच ही मुलगी त्या घटनेनंतर शाळेत जाण्यास नकार देत होती असंही तिच्या पालकांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

नोएडा येथील डीसीपी राम बदन सिंग यांनी सांगितलं की सदर स्वच्छता कर्मचाऱ्याविरोधात आम्ही POCSO अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसंच सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही आम्ही ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहोत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. शाळेने या प्रकरणी काय पावलं उचलली? याचीही चौकशी पोलीस करत आहे.

ऑगस्ट महिन्यात बदलापूरमध्येही अशीच घटना घडली होती. त्या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर २३ सप्टेंबरला त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. आता उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणीही अशीच घटना घडली आहे.