गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जय श्री रामचा नारा देण्यास सांगत एका मुस्लीम तरुणाला टोळक्याने मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडीओ आमदार जिग्नेश मेवानी यांनी शेअर केला आहे. याबद्दल पोलीस महासंचालकांना भेटून आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं जिग्नेश मेवानी यांनी सांगितलं.

व्हिडीओत काय?

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील दिओदर तहसील परिसरात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओत तीन तरुण एकाला जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत आहेत. तसेच, जोपर्यंत जय श्री राम म्हणत नाही, तोपर्यंत त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याचं दिसत आहे. २२ जुलै २०२३ चा हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Pune driving opposite direction, driving in the opposite direction,
पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
Loksatta vyaktivedh Kaluram Dhodde leads Bhumise Adivasi Indira Gandhi
व्यक्तिवेध: काळूराम धोदडे
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
Badlapur case, school trustees Badlapur case,
बदलापूर प्रकरण : …तर शाळेच्या विश्वस्तांना अद्याप का शोधू शकला नाहीत ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना संतप्त प्रश्न
nashik district court Rahul Gandhi
राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने उपस्थित राहण्याचा हुकूम देण्याचे कारण…

याबाबत जग्नेश मेवानी यांनी ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये जिग्नेश मेवानी म्हणाले की, “हे दोन व्हिडीओ आमच्या प्रगतशील गुजरातमधील बनासकांठ जिल्ह्यातील दिओदर तहसील येथील आहेत. यात एका मुस्लीम तरुणाला ( गुरांना चारण्यासाठी जात होता ) तथाकथित गो-रक्षकांनी मारहाण केली आहे. जय श्री राम बोलत नाही, तोपर्यंत या तरुणाला मारहाण करण्यात आली.”

“याप्रकरणी गुजरातचे पोलीस महासंचालक यांची भेट घेत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे,” असेही जिग्नेश मेवानी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.