उत्तर प्रदेशातील एक नगपरिषदेत नगरसेवक एकमेकांना भिडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी आमदार आणि नगराध्यक्षही समोर होते. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यानंतर हा व्हिडीओ ट्वीट करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील शामली या नगपरिषदेत नगरसेवकांच्या बैठकीत गुरूवारी ही घटना घडली. चार कोटींच्या विकास कामांवरती बैठकीत चर्चा सुरू होती. तेव्हा, दोन नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद एवढा टोकाला गेला की एका नगरसेवकाने दुसऱ्याला टेलबवर उभारून मारहाण केली. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरविंद सांगल, आमदार प्रसन्न चौधरी आणि नगरसेवकांसमोर ही वादावादी झाली.

हाच व्हिडीओ ट्वीट करत अखिलेश यादव यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. “जेव्हा विकास कामे होत नाहीत, तेव्हा आढाा बैठकीत दुसरे काय होणार? म्हणूनत शामलीतील नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली. भाजपा राजवटीचा धडा : स्वत:च्या सुरक्षा करूनच आढावा बैठकीला या,” असं म्हणत अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thrown at civic body meet uttar pradesh akhilesh yadav react to viral video ssa