दाऊद इब्राहीमचा निकटचा साथीदार टायगर हनीफ याने पुन्हा एकदा भारताच्या स्वाधीन न होण्यासाठी डावपेच आखण्यास प्रारंभ केला असून ब्रिटन सरकारकडे तसा त्याने एक अर्जही सादर केला आहे.
गुजरात राज्यात १९९३ मध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांप्रकरणी टायगर हनीफला भारतात पाठवून देण्यासंबंधी विचारणा करण्यात आली होती. मोहम्मद हनीफ उमेरजी पटेल असे त्याचे पूर्ण नाव असून गुन्हेगारी हस्तांतरण करारान्वये स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी फेब्रुवारी २०१० मध्ये अटक केली होती. त्याने भारतात परत न जाण्यासंबंधी केलेल्या अर्जावर व्यापक विचार करण्यात येत असल्याची माहिती ब्रिटनच्या गृह विभागाच्या प्रवक्त्याने दिली. भारतात आपला छळ करण्यात येईल, असा दावा करून हनीफ याने अनेकदा न्यायालयात धाव घेतली; परंतु तो तेथे यशस्वी होऊ शकला नाही. ब्रिटनच्या उच्च न्यायालयातही त्याची याचिका एप्रिल महिन्यात फेटाळण्यात आल्यानंतर हे प्रकरण गृहमंत्री तेरेसा मे यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा