वाघांच्या अवयवांचा चोरटा व्यापार चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढत असून त्यातील बहुतेक अवयवांची तस्करी ही भारत व म्यानमारमधून चालते असे एका अभ्यासात निष्पन्न झाले आहे.
चीन-म्यानमार सीमेवर मोंग ला येथे वाघाचे अवयव मिळणारी सहा दुकाने २००६ मध्ये होती आता २०१४ मध्ये ही संख्या २१ झाली आहे. चीनमध्ये वाघाच्या अवयवांच्या काही भागांचा वापर औषधात केला जातो, असे ट्रॅफिक या नामवंत स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे.  
म्यानमार व थायलंड सीमेवर ताचिलेक येथे वाघाचे व बिबटय़ाचे कातडे व कवटय़ा विकणारी दुकाने २००० मध्ये ३५ होती ती २०१३ मध्ये ६ पर्यंत खाली आली आहेत. दोन्ही शहरात वाघाच्या व बिबटय़ाच्या अवयवांची विक्री करणारे व्यापारी आहेत व ते हे अवयव म्यानमार व भारतातून मिळवतात. ट्रेड इन टायगर्स अँड अदर वाइल्ड कॅट्स इन मोंग ला अँड ताचिलेक म्यानमार अ टेल ऑफ टू बॉर्डर टाऊन्स या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.  ताचिलेक व मोंग ला येथील बाजारपेठा आंतरराष्ट्रीय सीमेवर आहेत व सीमेवरून तेथे बेकायदेशीरपणे वन्य प्राण्यांच्या अवयवांचा व्यापार चालतो. वाघाच्या अवयवांना बाजारपेठेत जास्त मागणी असते त्यात नखे, कवटी, दात व कातडे यांचा समावेश आहे. पाहणीच्या वेळी वाघाच्या किमान २००० अवयवांचा व्यापार झाल्याचे दिसून आले आहे.

Story img Loader