शेतकऱ्याच्या घराजवळ वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी सकाळी आंध्र प्रदेशाच्या नंद्याल जिल्ह्यातील गुम्मदापुरम गावात ही घटना घडली. सध्या चारही बछडे सुखरूप असून त्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आहे.
हेही वाचा- “…तर जपान लवकरच नामशेष होईल”, पंतप्रधानांच्या सल्लागारांनी व्यक्त केली भीती
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या गुम्मदापुरम गावातील एका शेतकऱ्याच्या घराजवळ असलेल्या शेतात वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. संबंधित शेतकरी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेला असता, त्याला हे वाघाचे बछडे दिसले. त्याने लगेच वनविभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. तसेच भटक्या कुत्र्यांच्या भीतीने चारही बछड्यांना सुरक्षित स्थळी हलवले.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत पाहणी केली. तसेच या बछड्यांना आपल्या ताब्यात घेतले. वाघिणी आपल्या बछड्यांना जन्म देताच अन्नाच्या शोधात निघून गेली असावी, असा संशय वनविभागाच्या अधिकाराऱ्यांनी व्यक्त केला. तसेच चारही बछड्यांची प्रकृती ठीक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा – धक्कादायक! विमान उतरण्यापूर्वीच प्रवाशाकडून इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न; एअर होस्टेसवरही केला हल्ला
वनविभागाकडून या वाघिणीचा शोध घेण्यात येत असून ही वाघीण बछड्यांना जन्म दिल्याच्या ठिकाणाहून दोन किलोमीटर परिसरातच असण्याची शक्यता असल्याचा दावा वनविभागाचे अधिकारी पांडे यांनी केला आहे. तसेच ही वाघीण बछड्यांच्या शोधत नक्कीच परत येईल, असंही त्यांनी सांगितले.