टू जी स्पेक्ट्रम खटल्यामध्ये रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे (एडीएजी) अध्यक्ष अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांनी शुक्रवारी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात साक्ष नोंदविली. 
रिलायन्स एडीएजीच्या विषयांमध्ये मी कोणताही निर्णय घेत नाही, असे त्यांनी आपली साक्ष देताना न्यायालयापुढे सांगितले. रिलायन्स एडीएजीशी संबंधित कोणत्याही फर्मशी माझा काही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रिलायन्स एडीएजीशी माझा काहीही संबंध नाही. मी गृहिणी असून, एक रुग्णालय चालवते. रिलायन्स एडीएजीमधील कोणत्याही कंपनीशी माझा काहीही संबंध नाही, असे त्यांनी सीबीआयचे न्या. ओ. पी. सैनी यांच्यापुढे सांगितले.
झेब्रा कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्वान कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांबद्दल मला काहीही माहिती नाही, असेही टिना अंबानी म्हणाल्या. त्यांचे पती अनिल अंबानी यांनीही या प्रकरणी गुरुवारी न्यायालयापुढे साक्ष नोंदविली होती.

Story img Loader