Chandrababu naidu on Tirupati Balaji Prasad Ladoos : तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता असं म्हणत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. या आरोपामुळे आता आंध्र प्रदेशात वाद निर्माण झाला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान ( Tirupati Balaji ) हे जगभरात प्रसिद्ध आहे. तसंच या ठिकाणी असलेले प्रसाद लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात.

चंद्राबाबूंच्या आरोपांमुळे खळबळ

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या ( Tirupati Balaji ) वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या ( Tirupati Balaji ) लाडूंबद्दल केलेल्या मोठ्या दाव्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. चंद्राबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Eknath khadse Devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ तात्विक मतभेद, एकनाथ खडसे यांची भूमिका मवाळ

चंद्राबाबू नायडूंचा नेमका आरोप काय?

मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं ( Tirupati Balaji ) पावित्र्य घावलंल. ‘अन्नदानम’ अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसंच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे. असं चंद्राबाबू नायडूंनी म्हटलं आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीच्या चरणी लीन, १४० कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी घातलं साकडं

तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवल्या जाणाऱ्या तिरुपती ( Tirupati Balaji ) येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात मागणीनुसार, प्रसादाचे लाडू दिले जातात. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना नायडू यांनी दावा केला की, प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाणारे तिरुमला प्रसादाचे लाडू निकृष्ट घटकांनी बनवले गेले होते, काँग्रेसच्या काळात या लाडूंचं पावित्र्य त्यांनी मुळीच राखलं नाही.

वायएसआर काँग्रेसचा पलटवार

वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडूंवर तिरुमला मंदिराचं पावित्र्य घालवल्याचा आरोप केला आहे. रेड्डी यांनी तेलुगू ऑन एक्समध्ये लिहिलं की, चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवली आहे. तिरुमला प्रसाद यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा प्रकारचे शब्द हे कुणीही बोलणं गैर आहे. असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे. आता यावरुन आणखी काय काय आरोप प्रत्यारोप केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader